---Advertisement---

स्व.संतोष पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या चपळगाव येथे विविध कार्यक्रम

On: September 25, 2022 11:49 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२५ : चपळगाव (ता.अक्कलकोट )येथील माजी सरपंच संतोष पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त चपळगाव येथे उद्या सोमवार (दि.२६ सप्टेंबर) रोजी सकाळी १० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संतोष पाटील मित्र परिवाराने दिली आहे. यानिमित्त रक्तदान शिबिर व जनावरांसाठी प्रतिबंधात्मक लंपी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच उमेश पाटील यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य,सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकारी व तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रक्तदान शिबीर मधला मारुती, बाजार गल्ली येथील प्रांगणात तर जनावरांसाठीचे तपासणी व लसीकरण शिबिर स्वर्गीय संतोष दादा पाटील मराठी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले आहे.तरी या कार्यक्रमाचा गावातील व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वर्गीय संतोष दादा पाटील मित्र परिवाराने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!