ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ड्रग्ज प्रकरण: भाजप नेत्यासह मुलांना अटक

कोलकाताः पश्‍चिम बंगाल राज्यातील पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी भाजपा नेते राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलांना घरातून अटक करण्यात आली आहे. ते पश्चिम बंगालमधून फरार होण्याच्या तयारीत होते, मात्र तत्पूर्वीच त्यांना अटक झाली आहे.

भाजपा युवा मोर्चाची कार्यकर्ता पामेला गोस्वामी हिला पोलिसांनी कोकेन आणि 10 लाख रुपयांसह पकडले होते. पोलिसांनी याप्रकरणी पामेला गोस्वामी हिच्यासह दोन जणांना अटक केली होती. या प्रकरणात भाजपाचे नेते राकेश सिंह यांचं नाव समोर आले होते. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी आणि भाजपाचे महासचिव असलेल्या कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय म्हणून राकेश सिंह यांची ओळख आहे.

पोलीसांच्या नोटीसीनंतर राकेश सिंह यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर पोलीस राकेश सिंह यांच्या घरी पोहोचले. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलामध्ये बाचाबाची झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!