---Advertisement---

शिरवळवाडी गावाजवळ क्रुझर आणि टँकरचा भीषण अपघात;सहा जणांचा जागीच मृत्यू

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट,दि.३० : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळवाडी गावाजवळ भाविकांच्या क्रुझरला भीषण अपघात झाला आहे.टँकर आणि क्रूझरमध्ये समोरासमोर झालेल्या या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे.उर्वरित सहा ते सात जखमींना अक्कलकोटच्या ग्रामीण रुग्णालयाकडे आणले जात आहे. यात पाच महिला एका मुलाचा समावेश असल्याची माहिती आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रुझर गाडी वागदरीकडे जात होती आणि टँकर हा गुलबर्गाहून सोलापूरकडे येत होता. गाडी कर्नाटक पासिंग असल्याची माहिती मिळत आहे.देवदर्शन करुन गावाकडे जात असताना हा अपघात झाला.या भीषण अपघातामध्ये कर्नाटकातील अणूर (ता.आळंद) गावचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती परिसरातील गावांमध्ये समजतात मदत कार्य वेगाने सुरू झाले असून जखमींना रुग्णालयाकडे आणले जात आहे. या घटनेची माहिती समजताच रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, वागदरी ग्रामपंचायतीचे उमेश पोमाजी हे घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना शासकीय रुग्णालयाकडे दाखल करण्याकामी मदत करत आहेत. पोलीसही घटनास्थळी पोहोचले असून या घटनेचा तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!