ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाहन चालू, प्रेम सुरु : पुण्यातील कारच्या छतावर स्टंट करत रोमान्स, व्हिडिओ व्हायरल !

पुणे : वृत्तसंस्था

पुण्यातील खराडी परिसरात रविवारी (दि. १०) सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली. भर रस्त्यात धावत्या कारच्या छतावर तरुण-तरुणीने स्टंट करताना एकमेकांशी जवळीक साधल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

खराडीतील मुख्य रस्त्यावर एका कारच्या रूफटॉपवर बसून हे दोघं स्टंटबाजी करताना दिसले. चालू वाहनाच्या छतावर बसून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत वाहतूक सुरक्षेच्या नियमांचा भंग केला. या प्रकारामुळे इतर वाहनचालक आणि नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, अशा बेजबाबदार कृत्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली असून संबंधित तरुण-तरुणींचा शोध सुरू केला आहे.

या घटनेमुळे तरुणांमध्ये वाढणारी स्टंटप्रवृत्ती, सार्वजनिक सुरक्षेचा अभाव आणि वाहतूक नियमांबाबतची उदासीनता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!