ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक

मुंबई : गेल्या महिन्या भरापासून राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी पाच वाजता एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात लॉकडाऊन लावायचा की कठोर निर्बंध लावण्यात येणार यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात गुरुवारी तब्बल ४३ हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर २४९ जणांचा मृत्युची नोंद झाली आहे. यामुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. गेल्यावर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिकांचं कंबरड मोडलं होतं. आर्थिक गणित बिघडली होती. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर कुणाची पगार कपात झाली. यामुळे लॉकडाऊन नकोच असा सूर सर्व स्थरातुन येत आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकार मधील अनेक मंत्र्यांचा लॉकडाऊन लावण्यास विरोध असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्यात पूर्णत: लॉकडाऊन लावण्याऐवजी आणखी कठोर निर्बंध लावले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!