ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पुढील तीन दिवस मराठवाड्यात थंडीचा जोर वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीचा जोर वाढत असून आगामी तीन दिवस उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान १० ते १२ अंशादरम्यान राहील, विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांत २३ जानेवारीपर्यंत किमान तापमान १० ते १२ तर कमाल २६ अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीर, दिल्ली, हिमाचल प्रदेश, आसामसह उत्तर भारतात धुक्यामुळे रेल्वे २ ते १० तास विलंबाने धावत होत्या. शिर्डी-कालका व हुबळी निजामुद्दीन या गाड्या रद्द केल्या, असे सूत्रांनी सांगितले.

देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला नवीन वर्षात सातत्याने कडाक्याच्या बंडीचा सामना करावा लागत आहे.आसाममधील नौगाव येथे सर्वात कमी ३ अंश सेल्सियस तापमान होते. उत्तर, पूर्वव मध्य भारतातील बहुतांश भागात दोन दिवसात किमान तापमान तीनते आठ अंशादरम्यान राहू शकते. २३ नंतर तापमान वाढू लागेल, पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आसाम, मेघालयात २३ जानेवारीपर्यंत तर ओडिशा, प. बंगाल,सिक्किममध्ये २२ पर्यंत धुके जाणवेल, असे हवामान विभागाने महटले आहे.२४ जानेवारीपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये सौम्य वर्फवृष्टी होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!