अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री गणेश वंदना..!, कृष्ण वासू देवाय..!, गुरु देवा..! रामकृष्ण हरी..!, माझी माऊली..!, माझे गुरुनाथा..!, आहे पुण्याईची..!, श्री स्वामी समर्थ..!, निरंकर हो..!, अशा एक ना अनेक मराठी भावगीते व भक्तीगीतांनी ख्यातनाम गायक महेश काळे व सहकारी पुणे यांच्या सप्तसुरांच्या आविस्कारांनी सजलेली ही ‘स्वर संध्या’ ची मैफिल रसिकांसाठी पर्वणीच ठरली.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, गुरुवार दि. १८ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. ‘स्वर संध्या’ सादरकर्ते – महेश काळे आणि सहकारी पुणे यांचा ह्या कार्यक्रमाने आठवे पुष्प संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोहन डांगरे, सोलापूर शहरचे पोलीस उपाआयुक्त श्री व सौ. विजय कबाडे, श्री व सौ. अॅड. पी.बी.लोंढे-पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू व प्राभात चित्र मंदिराचे, उद्योगपती श्री व सौ. नीरज पाटील, सोलापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मोनिकासिंह ठाकूर, सो.म.पा. उपायुक्त आशिष लोकरे, तहसीलदार विनायक मगर, पो.नि.राजेंद्र टाकणे, दिलीपभाऊ कोल्हे, स्थापत्य अभियंता राजेश निलवाणी, सराफ व्यापारी अभिनंदन गांधी, श्री शहाजी प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजीराव शिंदे, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ.विनायक बुधले, उद्योजक विलास कोरे, उद्योजक स्वामिनाथ हिप्परगी, स्थापत्य अभियंता अशोक येणगुरे, उद्योजक दिनेश पटेल, उद्योजक सिद्धेश्वर मोरे, उद्योजक काशिनाथ गोळ्ळे, योगेश डांगरे, गजानन पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी लोकप्रिय मराठी भावगीते व भक्तिगीते सादरकर्ते – ख्यातनाम गायक महेश काळे व सहकारी पुणे यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. नुकतेच महेश काळे यांना पुणे बालगंधर्व गुण गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल न्यासाकडून विशेष सत्कार करण्यात आला.
गुणीजन गौरव : नितीन चव्हाण – आदर्श सरपंच ग्राम पंचायत शावळ, सौ. सरोजताई तोळनुरे –परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ, गौरीशंकर वाडीकर –प्रशिक्षण भूमापक भूमिअभिलेख अक्कलकोट, व्यापारी राजकुमार कोळी, योगेश जाधव पोलीस पाटील चिक्केहळ्ळी यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
शुक्रवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत ‘भक्तिरंग’ भक्तिगीते, भावगीते व नृत्य सादरकर्ते संस्कृती बालगुडे आणि सहकलाकार पुणे यांचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अर्पिताराजे भोसले, अनुयाताई फुगे-पाटील, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, हिरकणी संस्थेच्या जयश्री मगर, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल क्षीरसागर, सुवर्णा घाडगे, छाया पवार, व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, संदीप फुगे-पाटील, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, मनोज निकम, अशोक उटगे, प्रा.शरणप्पा आचलेर, अरविंद शिंदे, ओंकारेश्वर उटगे, अॅड.संतोष खोबरे, राजु नवले, निखील पाटील, पिंटू दोडमनी, ओंकार माने, सुहास डोईफोडे, प्रा.प्रशांत शिंपी, जवहार जाजू, राजीव क्षीरसागर, शेखर फंड, विठ्ठल तेली, भरत राजेगावकर, स्वप्नील मोरे, प्रवीण घाडगे, गोटू माने, सौरभ मोरे, रोहित खोबरे, अतिश शिंदे, अतिश पवार, आकाश सुरवसे, अभिजित लोकापुरे, प्रितेश किलजे, गोविंद शिंदे, स्वामिनाथ गुरव, धनंजय गडदे, किरण पाटील, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, बिरप्पा व्हनजंडे, प्रसाद हुल्ले, ज्ञानेश्वर भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले.