ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महापालिका निवडणुकीत युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील समीकरणे पाहून स्थानिक नेतेच घेतील – एच. के. पाटील

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. काँग्रेस स्थापना दिनाचे औचित्य साधत २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्कवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा घेतला जाणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली आहे.

मुंबईत पार पडलेल्या बैठकीला एच. के. पाटील यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी खासदार संजय निरुपम, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे,नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, बी. एम संदिप, वामसी रेड्डी, सोनल पटेल, संपतकुमार, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

एच. के. पाटील म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ५० मिनिटे चर्चा झाली असून जाहीरनाम्यासह निवडणुकीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांविषयी यावेळी चर्चा झाली असे त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर युती किंवा आघाडी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली नाही. मात्र स्थानिक पातळीवरील समीकरणे पाहून स्थानिक नेतेच त्यासंदर्भात निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!