---Advertisement---

मोठी बातमी : कोकाटेंची दादांना ऑफर : सिन्नरमध्ये लाखो मतांनी निवडून आणू !

By team
On: October 11, 2024 5:40 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शरद पवार व अजित पवार गटात यंदाचे चांगलेच राजकारण तापले असतांना नुकतेच अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुक सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी ऑफर माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिन्नरमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना ही ऑफर दिली आहे. मात्र अजित पवार यांनी आपल्या घरट्यात गेलेलेच बरे, असे म्हणत बारामतीला आपली पसंती असल्याचे स्पष्ट केले आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांनी सिन्नर मधून निवडणूक लढवावी, त्यांना कमीत कमी दीड लाख मताधिक्याने निवडून आणू. जर त्यांच्या मताधिक्यात दीड लाखांपेक्षा एकही मत कमी मिळाले, तर मंत्रालयाची पायरी चढणार नसल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.

मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी याला उत्तर देताना माणिकराव कोकाटे यांच्या कामाचा कौतुक केले. आमदारांच्या हातात धमक आणि ताकद असावी लागते. तसाच आमदार तुम्हाला लाभला असल्याचे अजित पवार यांनी उपस्थितांना म्हटले आहे. मात्र बारामती माझी आहे. त्यामुळे आपल्या घरट्यात गेलेलेच बरे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. मी नुसता दुसरीकडे लढणार अशी चर्चा बारामतीकरांनी ऐकली तरी त्यांनी मला घेराव घातला होता. त्यामुळे आपली बारामतीच बरी असल्याचे ते म्हणाले. बारामती माझी आहे, त्यामुळे आपल्या घरट्यात गेलेलेच बरे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!