ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजच्या बैठकीत ठरणार जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशा

जालना : वृत्तसंस्था

दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला हरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी वेगवेगळे डाव आखले जात आहेत. रात्रीतून निर्णय बदलले जात आहेत. कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी २५ फेब्रुवारी दुपारी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची अंतिम आणि निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक बाबी समाजासमोर आपण उघड करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी दिला.

ते म्हणाले, सगेसोयऱ्याची अधिसूचना काढली. परंतु, निर्णय घ्यायला आणि आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. पूर्वी एकच राजा असल्यामुळे न्याय मिळायचा. आता तीन-तीन राजे असल्याने न्याय मिळणे अवघड दिसत आहे. त्यामुळे समाजबांधवांची अंतिम आणि निर्णायक बैठक घेत आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!