नुतन वर्षाची पुर्वसंध्या वटवृक्ष मंदिरात भावगीतांनी रंगली !
कोल्हापुरातील बहुरूपी भजन, भारुड सादरीकरणाने वेधले लक्ष
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
नूतन वर्षाच्या स्वागताकरिता जमलेल्या कोल्हापूर व परिसरातील असंख्य भाविकांच्या भक्तीमय भजन भारुड व धार्मिक कार्यक्रम सादरीकरणाने वटवृक्ष मंदिरात सरत्या वर्षास भावपूर्ण निरोप देण्यात आला आणि नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमास कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपुर, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, अहमदनगर, परभणी, नांदेड आदी विविध जिल्हयांसह हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.या सर्व भाविक कलाकारांच्यावतीने वटवृक्ष मंदिरात टप्प्याटप्प्याने विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमाने दर्शनाला आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
वटवृक्ष मंदिरातील ३१ डिसेंबरचे (थर्टी फस्टचे) विशेष आकर्षण असलेल्या कोल्हापूर येथील भजनी मंडळांच्या भजन गीतांनी दुपारी १२ वाजता नुतन वर्षाच्या स्वागतीय कार्यक्रमांना सुरुवात झाली. उत्तरार्धात सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगला. प्रारंभी कोल्हापूर येथील श्री साई समर्थ भजन मंडळ यांच्या सुनिल देशमाने प्रस्तुत नुतन वर्ष हे स्वामींच्या चरणी या भजन गीतांच्या कार्यक्रमात गणेश वंदन गीत सादर करून उपस्थित भाविकांची उत्सुकता वाढविली. यानंतर शिर्डी माझे पंढरी, ओंकार स्वरुपा, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, वासुदेव, वासुदेव म्हणा, शेगावीचा राजा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, इत्यादी श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, वासुदेव, संत तुकाराम महाराज, आदिंसह अनेक सत्पुरुष संतांच्या भारुडरूपी भजन गीतांसह अनेक भावभक्तीगीते सादर करून नुतन वर्षानिमीत्त पाश्चात्य संस्कृतीस विसंगती देवून भारतीय संस्कृतीचे व आध्यात्माचे
आदर्श जगासमोर मांडले.या कार्यक्रमात त्यांना गायनावर सुनिल देशमाने, ललाटी भंडारनृत्य अप्पा भद्रीगे, वासुदेवाच्या रुपात युवराज खोत, घागरनृत्य सोनल पुजारी, तबल्यावर बाळू कांबळे, साईबाबाच्या रुपात मन्सूर पठाण, चौडक वादक तानाजी बडेकर, टाळवर ओंकार सोनुले, गणराज रुपात अजिंक्य जाधव, ढोलकीवर तुषार डकरे, विठ्ठलाच्या रुपात सौरभ सोनुले, ढोलकी वादक अमोल साठे, हार्मोनियमवर अण्णा छपरे आदिनी व इतर सहकाऱ्यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, पुुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, श्रीशैल गवंडी, अमर पाटील, अश्विन कोळी,प्रसाद सोनार, गिरीश पवार, सागर गोंडाळ, सचिन पेठकर, अविनाश क्षीरसागर, महादेव तेली, प्रशांत गुरव, देविदास गवंडी, गणेश दिवाणजी, काका सुतार आदीसह कोल्हापूर येथील असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते.