ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकसहभागातून सलगरमध्ये उभारले पहिले कोव्हिडं केअर सेंटर

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोव्हिडं केअर सेंटरमुळे रुग्णांना निश्चितच दिलासा
मिळेल, अशा प्रकारचा प्रयत्न प्रत्येक
गावात होण्याची गरज आहे त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तालुका गटविकास अधिकारी महादेव कोळी
यांनी केले.

गाव तेथे कोविड सेंटर या संकल्पनेतून मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचनेनुसार ग्रा.पं. सलगर येथे लोकवर्गणीतून जमा झालेल्या निधीतून जि.प.प्रा.शाळा सलगर येथे कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. त्याची पाहणी गटविकास अधिकाऱ्यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महिला बालकल्याण समितीचे सभापती स्वाती शटगार, सरपंच सुरेखा गुंडरगी, गटविकास अधिकारी महादेव कोळी यांनी कोविड सेंटरची पाहणी केली.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी कोळी यांनी सलगर ग्रामस्थांचे व पदाधिकारी, कर्मचारी यांचे कौतुक केले. अक्कलकोट तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत ही बाब चिंतेची असून त्याला रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडावीत.त्यासाठी गावचे सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांनी सहभाग महत्त्वाचा आहे.त्यांनी देखील त्या ठिकाणच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रदीप तोरसकर, तलाठी रमाकांत भासगी, संजयकुमार डोंगराजे, श्रीशैल बिराजदार, अशोक पाटील, मल्लिनाथ भासगी, ग्रा.पं सदस्य काशिनाथ कुंभार व इतर ग्रा.पं.सदस्य, सर्व जि.प.शाळेचे शिक्षक, ग्रा.पं कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!