मुंबई : आयसीसीने नुकतेच टी-20 विर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 ऑक्टोंबरला ओमान आणि पापुआ न्युगिनी या दोन देशात पहिला सामना होणार आहे. दुसरा सामना स्कॉटलँड आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. तर 24 ऑक्टोंबरला भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिला सामना रंगणार आहे.
Get ready for the cricket carnival 🎉
The fixtures for the ICC Men's #T20WorldCup 2021 – Super 12 👇 pic.twitter.com/7q4vqNibHR
— T20 World Cup (@T20WorldCup) August 17, 2021
ग्रुप ए मधील पहिला सामना 18 तारखेला होणार आहे. 22 ऑक्टोंबरपर्यंत फेरीतील सर्व सामने खेळले जाणार आहे. नंतर दोन्ही ग्रुपमधील दोन टॉप संघांना सुपर-12 मध्ये जागा निश्चित होणार. ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज या संघाचा समावेश असेल. पहिल्या फेरीनंतर 23 ऑक्टोंबरपासून सुपर-12 मधील संघाच्या समान्याची सुरुवात होईल. यामधील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या होईल. हा सामना अबुधाबी याठिकाणी होईल. त्याचदिवशी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुबई येथे दुसरा सामना रंगणार आहे.