ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशातील ज्येष्ठांना सरकार देणार दुप्पट पेन्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 23 जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अशा परिस्थितीत, नोकरदार वर्गापासून शेतकरी, व्यापारी ते पेन्शन धारकांपर्यंत समाजातील प्रत्येकाला सरकारकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत. यादरम्यान, आगामी अर्थसंकल्पात (बजेट) अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदवार्ता मिळण्याची शक्यता असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

मोदी सरकार आपल्या प्रमुख सामाजिक सुरक्षा योजना अटल पेन्शन योजनेअंतर्गत किमान हमी रक्कम दुप्पटीने वाढवून 10 हजार रुपये करू शकते. दि. 23 जुलै रोजी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सध्या त्यांच्या आर्थिक परिणामाचे मूल्यांकन करत आहे आणि अर्थसंकल्पापूर्वी त्यावर निर्णय घेतला जाईल. देशातील सामाजिक सुरक्षा फ्रेमवर्क मजबूत करण्याचे सरकारचे ध्येय आहे कारण ते सामाजिक सुरक्षेवरील कामगार संहितेच्या अंमलबजावणीसाठी पाया घालते. 20 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार अटल पेन्शन योजनेत एकूण 6.62 कोटी खाती असून 2023-24 मध्ये 1.22 कोटी नवीन खाती उघडली गेली.

या सरकारी पेन्शन योजनेला आणखी आकर्षक बनवण्यासाठी सरकारला काही प्रस्तावही दिले गेल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये हमी रक्कम वाढवण्याचाही समावेश असून सध्या या प्रस्तावावर विचार केला जात आहे. सध्या, योगदानाच्या आधारावर दरमहा रु. 1 हजार ते 5 हजार रुपये हमी पेन्शन मिळते, ज्यात सरकारने हमी फायदे आहेत. गेल्या महिन्यात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मोहंती म्हणाले होते की 2015 मध्ये योजना सुरू झाल्यापासून 2023-24 मध्ये अटल पेन्शन योजनेअंतर्गत नावनोंदणी सर्वाधिक होती. या योजनेद्वारे मृत्यू किंवा कोणत्याही गंभीर आजाराच्या बाबतीत जमा केलेल्या रकमेपैकी 100 टक्के रक्कम वयाच्या 60व्या वर्षी काढता येते तर, आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

पेन्शन नियमकाने या योजनेतील हमी पेन्शन रकमेत वाढ करण्याच्या मागणीला पाठिंबा दिलासा असून पेन्शन नियमकाने म्हटले की सध्याची रक्कम कालांतराने त्याचे मूल्य टिकवून ठेवू शकणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला अर्थमंत्र्यांनी सांगितले होते की अटल पेन्शन योजना ही एक परवडणारी योजना म्हणून तयार करण्यात आली आहे ज्यामध्ये पेन्शन रकमेची हमी आहे. योजनेने सुरुवातीपासून 9.1 टक्के परतावा दिला आहे जो इतर बचत योजनांच्या तुलनेत खूपच स्पर्धात्मक आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, अटल पेन्शन योजना ही गरीब आणि निम्न मध्यमवर्गीयांसाठी अनुदानित योजना असून बहुतेक पेन्शन खाती खालच्या स्लॅबमध्ये आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!