अक्कलकोट,दि.२७ : ग्रंथालयामुळे ज्ञानाची भुक भागवली जाते. ग्रंथालये ही पुस्तकांनी समृद्ध असली पाहिजेत,असे प्रतिपादन स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांनीे केले.श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयात ग्रंथपूजन करून इंगळे यांच्या हस्ते ग्रंथदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव होत्या.
पुस्तके ही जीवनामध्ये दिपस्तंभाचे काम करतात. पुस्तके जीवनात दिशा दाखवतात,असे जाधव यांनी सांगितले. ग्रंथ हे मानवी जीवनामध्ये ऑक्सिजनचे काम करतात.श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टने २५ बेडचे अद्ययावत कोविड सेंटर सुरू केले. अहोरात्र तीथे वैद्यकीय सेवा सुरू आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे,असे उपाध्यक्षा आरती काळे यांनी सांगितले.
यावेळी श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाचे संचालक कै. उध्दवराव जंगाले यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती इंदुमती जंगाले यांनी वाचनालयातील ग्रंथ ठेवण्यासाठी दोन लोखंडी रॅक वाचनालयास भेट दिले.
याप्रित्यर्थ त्यांचा महेश इंगळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन सुरेश भोसले यांनी केले. कार्यक्रमास आरती काळे, प्रा.भिमराव साठे, अॅड. प्रशांत शहा, सुरेश भोसले, बाळु जंगाले, ग्रंथपाल दत्तात्रय बाबर, दिनकर शिंपी, प्रसाद काळे, यश जाधव ,स्नेहा नरके आदि उपस्थित होते.