अन्नछत्र मंडळाच्या उल्लेखनीय कार्यामुळेच न्यासाचे नाव सातासमुद्रापार
उपमुख्यमंत्र्यांकडून अन्नछत्र मंडळाचे कौतुक
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास गेल्या ३७ वर्षातील उल्लेखनीय कार्यामुळे आज न्यासाचे नांव सातासमुद्रापार केले असून, महाप्रसादाच्या सेवेबरोबरच विविध उपक्रम हे धाडशी नेतृत्व व प्रबळ इच्छाशक्तीमुळेच प्रचंड विस्तार होत आहे. अन्नछत्र हे आम्हा फडणवीस कुटुंबियांचे श्रद्धास्थान असल्याचे मनोगत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात आले असता, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फडणवीस कुटुंबीय आम्ही श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी स्वामी भक्तच, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, हे स्वामींची प्रचितीच आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे गेली ३७ वर्ष सातत्याने महाप्रसाद वाटपाची जवाबदारीने व अत्यंत भक्ती भावाने पार पाडली आहे. आज अन्नछत्र मंडळाच्या भविष्यातील विस्तारित अतिभव्य प्रसादालायाचे संकल्प रेखा चित्र बघायला मिळाले. ते अतिशय उत्तम असून,अक्कलकोटमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाची काळजी घेऊन, पुढील २५ ते ५० वर्षात तीर्थक्षेत्र अक्कलकोटचा होणाऱ्या विकासाचा मागोवा घेऊन रेखाचित्र बनविलेला आहे. या प्रकल्पामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडणार आहे. या प्रकल्पास माझ्या खूप खूप शुभेच्छा..!
दरम्यान मंडळाच्या वतीने नव्याने बांधण्यात येणाऱ्या महाप्रसाद गृहाच्या वास्तूची संपूर्ण माहिती ना. देवेंद्र फडणवीस यांना न्यासाचे वास्तुविशारद योगेश अहंकारी यांनी दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष (बापू) देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान अवताडे, ना. देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव दिलीपराव राजूरकर, स्वीय सहायक मनोज मुंडे, भाजपा माजी भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महेश हिंडोळे, राजकुमार झिंगाडे हे उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, वास्तुविशारद योगेश अहंकारी, मनोज निकम, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाडगे, कल्याण देशमुख, दत्ता माने, निखील पाटील, गोटू माने, प्रविण घाडगे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.