ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत मृत्यु झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

दिल्ली : अति मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात एकूण सहा ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळून 35 घर दरडी खाली गाडले गेले आहेत.

रायगड जिल्ह्यातील तळई गावातील दुर्घटनेत आतापर्यंत 38 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर अजून 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर रायगडमधील पोलादपूर तालुक्यात भूस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे तसेच महाराष्ट्राला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहेत.

“महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात दरड कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल अत्यंत क्लेश वाटला. मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना.जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात ही सदिच्छा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या स्थितीवर लक्ष असून पावसाचा फटका बसलेल्याना आवश्यक ती मदत पुरवली जात आहे”.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगडमधील तळई गावातील दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०,००० रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!