मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय नवीन वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु
यंदाच्या वर्षापासून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन
सोलापूर : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अशोक नगर सोलापूर व मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह नवीन , अशोक नगर, विजापूर रोड, सोलापूर या वसतिगृहामध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया चालू झालेली असून या वर्सातगृहामध्ये अनु. जाती, जमाती, इतर मागास वर्ग, विमुक्त व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज वातावरणात उत्तम शिक्षण देऊन त्यांना राष्ट्र उभारणीच्या मुख्य प्रवाहात सामिल करणे हे या योजनेचे प्राथमिक उहिष्ट आहे.
प्रवेश कोणासाठी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह अशोक नगर सोलापूर या वसतिगृहात इयत्ता आठवी पासून पुढील उच्च व्यवसायिक व बिगर व्यवसायिक वर्गासाठी तर मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय नवीन वसतिगृह येथे इयत्ता अकरावी व आय.टी.आय या वर्गातील विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश दिला जातो.
गुणवत्ते नुसार प्रवेशित विद्यार्थ्यांना निशुल्क पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा –
इ.८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रु.४०००/- शे. साहित्यासाठी (प्रती वर्ष),शालेय विद्यार्थ्यांना रु.१००० दोन गणवेशासाठी (प्रती वर्ष) ,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रु.२०००/- दोन गणवेशासाठी (प्रती वर्ष) ,दरमहा निर्वाह भत्ता रु.६००/- , शैक्षणक सहलीसाठी रु. २०००/- (प्रती वर्ष) व इतर सुविधा.,तसेच सुसज्ज भोजन कक्ष, प्रशस्त निवास व्यवस्था, कॉट, गादी व इतर बेडिग साहित्य, पिण्यासाठी ,R.O. फिल्टर पाणी, २४ तास सी.सी.टि.व्ही सुरक्षा, खेळासाठी क्रिडा साहित्य इत्यादी सुविधा विनामूल्य मोफत दिल्या जातात.
अर्ज करण्याची प्रक्रिया दि.११ जून २०२५ पासून सुरु झाली आहे. सन २०२५-२६ पासून ही प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. http://hmas.mahait.org या पोर्टलवर आहे भरावेत.अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अशोक नगर सोलापूर येथे संपर्क साधावा.असे अहवान वसतिगृहाचे गृहपाल सुरेश काळे यांनी केले आहे.