अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देशाची वाटचाल सुरू असून देशाची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मुत्सद्दी महापुरुष होते. ते अर्थतज्ञ , जलनिती तज्ञ , सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , पत्रकारिता क्षेत्रातील निष्णात विद्वान होते. त्यांच्या विचारधारेवरच समाजाची प्रगती होत आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
रविवारी,अक्कलकोट शहरातील भीमनगर येथे मोठया उत्साहात विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याती आली.त्यावेळी ते बोलत होते.प्रारंभी आमदार कल्याणशेट्टी व अन्य मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी,मुस्लिम समाज ट्रस्टचे एजाज मुतवल्ली, माळी महासंघाचे संतोष पराणे,बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजयकुमार हार्डेकर,ननू कोरबू ,नागू कुंभार,राम जाधव,सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद भागव,पत्रकार मारुती बावडे,पत्रकार स्वामीराव गायकवाड,पत्रकार राजेश जगताप मोहन चव्हाण,रिपाई तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे,वंचित तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड,शिलामनी बनसोडे,जयंती समितीचे अध्यक्ष शुभम मडिखांबे,संदिप मडिखांबे,पंच कमिटी बंडू काका मडिखांबे,कल्याणी घाटगे,भारत सोनकांबळे विजयकुमार बाळशंकर,उदय सोनकांबळे,दत्ता मडिखांबे आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित मान्यवराचां सत्कार जयंती उत्सव समितीकडून करण्यात आला.
यावेळी पो. नि. राजेंद्र टाकणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. चिमुकल्या विद्यार्थ्याची विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली.
यावेळी गंगाराम मडिखांबे,चनबस बनसोडे, प्रकाश गायकवाड,पंकज मडिखांबे,सिध्दार्थ साळे,लावा गायकवाड,काशिनाथ मडिखांबे,अर्जुन साळे,श्रीमंत बनसोडे,सुरेकांत मडिखांबे,भिमशा बनसोडे,विजयकुमार मडिखांबे,अमित बनसोडे,सचिन बनसोडे,प्रनेश बनसोडे, स्वामी गायकवाड,दशरथ मडिखांबे,तुषार गायकवाड,रोमीत मडिखांबे,संदिप गायकवाड आदी सर्व भीमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.