ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चपळगावात दक्षिणमुखी प्राचीन हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धराचे काम प्रगतीपथावर

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे लोकसभागातून अतिप्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू आहे.यासाठी स्लॅबचे पूजन सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या मंदिरावरती एकूण २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून १२ लाख रुपये हे लोकसभागातून तर ८ लाख रुपये हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या आमदार निधीतून घेण्यात आले आहेत. या मंदिराची देखभाल दुरुस्ती व इतर कामे होण्यासाठी नवीन ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून त्याच्या अध्यक्ष पदी मनोज इंगोले यांची निवड करण्यात आली आहे.

मंगळवारी स्लॅब बांधकामाचे पुजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.या मंदीराचे जीर्णोद्वार आणि कळसारोहण मोठ्या स्वरूपात करण्याचे नियोजन आहे. हे काम तीन ते चार महिन्यात पूर्ण होईल, असा अंदाज आहे, अशी माहिती सरपंच पाटील यांनी दिली.

प्रारंभी १ लाख ५१ हजार रुपयेची देणगी सरपंच पाटील यांनी दिली आहे. नियोजित खर्चाच्या रकमेत आणखी काही निधी कमी पडला तर उर्वरित खर्च ते उचलणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष इंगोले यांनी सांगितले. या मंदिराचे काम सध्या वेगाने सुरू असून या सर्व कामावर ट्रस्ट पदाधिकारी आणि सरपंच पाटील हे लक्ष ठेवून आहेत.यावेळी युवा नेते बसवराज बाणेगाव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महेश पाटील, चिदानंद हिरेमठ, रियाज पटेल,ग्रा. पं. सदस्य प्रदिप वाले,विलास कांबळे, परमेश्वर वाले,श्रावण गजधाने, संगम भंगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसहभाग आवश्यक

गावच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात लोकसभागाशिवाय काम पूर्णत्वास जात नाही हे मंदिर अति प्राचीन आहे आणि जागृत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व भाविकांनी सढळ हाताने या कार्यासाठी मदत करावी – उमेश पाटील,सरपंच

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!