ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रस्ता बनला जीवघेणा, पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी

दुधनी दि.२४ : येथील अक्कलकोटहुन गाणगापूरकडे जाणाऱ्या सोंडे गल्ली जवळ रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असून यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत.

सोंडे गल्लीच्या पाठीमागे नगरपालिकेचा विंधन विहीर आहे. या विंधन विहिरीचे पाणी पाईपलाईन मार्फत येथील भीमनगरमधील पाण्याच्या टाकीला देण्यात आली आहे. त्या जोडणी लिक झाल्याने रस्त्यावर पाणी साचत असल्याने रस्ता पूर्ण चिखलमय बनला आहे. या संदर्भात नगरपालिकेला कल्पना दिल्यानंतर नगरपालिकेच्यावतीने खड्ड्यात माती टाकून खड्डा बुजविण्यात आले.

पाईपलाईन करताना रस्ता खोदून पाईपलाईन करण्यात आले आहे. सद्या लॉकडाउन असल्याने या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी आहे. तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविक गाणगापूर येथील श्री दत्तात्रेय महाराज यांच्या दर्शनासाठी आवर्जून जातात. अक्कलकोटहुन गाणगापूरला जाताना दुधनीवरून जावे लागते. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. सद्या फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने फिरत आहेत. परिसरातील दुचाकी वाहन धारकांना काही कामानिमित्त या रस्त्यावरून जात असताना जीव मुठीत धरून फिरावं लागत आहे. कारण खाड्ड्यामध्ये माती टाकुन खड्डा बुजविण्यात आल्याने रस्ता चिखलमय होऊन दुचाकी वाहने घसरत आहेत.

पावसाळा आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्यातील मातीकाढून डांबरीकरण करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!