ध्यास विश्वसार्ह बातमीचा

किणीच्या जाधव परिवार आणि पुण्याच्या नलवडे परिवारातील सुप्रिया व सुयशचा शाही विवाह सोहळा संपन्न; पुण्याच्या सेंटोसा रिसॉर्टमध्ये मान्यवरांची मांदियाळी !

मारुती बावडे

पिंपरी चिंचवड ( पुणे ) : हजारो वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत किणीच्या जाधव परिवारातील चि.सौ.का सुप्रिया आणि इंदापूरच्या नलवडे परिवारातील सुयशचा शुभविवाह पुणे – मुंबई एक्स्प्रेस हायवेवरील रावेत येथील सेंटोसा रिसॉर्ट अँड वाटर पार्क येथे गोरज मुहूर्तावर ५ वाजून ४२ मिनिटांनी मोठ्या थाटामाटात शाही पध्दतीने उत्साहात पार पडला. या देखण्या विवाह सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी दिग्गज मान्यवर व नेते मंडळींची प्रमुख उपस्थिती होती.

चि.सुयश हे पुण्यातील इंडस्ट्रीयल बांधकाम क्षेत्रातील उद्योजक निवृत्ती किसनराव नलवडे (रा.निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड) यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत.चि. सौ. का सुप्रिया ह्या मूळच्या किणीच्या पण सध्या पुण्यात असलेल्या उद्योजक स्वामींनाथ एकनाथ जाधव (रा.किणी ता.अक्कलकोट ) यांच्या त्या कन्या आहेत.स्वामीनाथ जाधव यांनी १९९० साली पुण्याला गेले आणि स्वकर्तुत्वाने पुण्यात उद्योग क्षेत्रात मोठी मजल घेतली.

आज ते गेली ३२ वर्ष पुण्यात वास्तव्यास आहेत. आज सूर्या एंटरप्राइजेस आणि श्री गणेश इंजिनिअरिंगची त्यांनी स्थापना केली. त्यामध्ये ते प्रामुख्याने इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर टॅपचेंजरचे सुटे भाग व असेंम्बली भाग याचे उत्पादन करून पुणे, औरंगाबाद सारख्या ठिकाणी नामवंत कंपन्याना माल पुरवठा करत असतात. या शुभ विवाह सोहळयाप्रसंगी त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव करत पुण्यातील उद्योजकांनी वधूवरांना शुभेच्छा दिल्या.या विवाह सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत स्वामींनाथ जाधव, सुवर्णा जाधव व दीपक जाधव ,सुधाकर जाधव यांनी केले. तर नलवडे परिवाराच्यावतीने निवृत्ती नलवडे व वनिता नलवडे यांनी स्वागत केले.

चौरासिया केटर्सने भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती. डेकोरेशनचे काम प्रगती डेकोरेटर्सने यांनी केले. पुरोहित सचिन काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा विवाह सोहळा संपन्न केला. या विवाह सोहळ्याने उपस्थित त्यांच्या अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले. या विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन शब्द ब्रम्ह इव्हेंट मॅनेजमेंटच्या निवेदिका पूजा थिगळे यांनी केले.मनोरंजनासाठी संगीत ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील, भोसरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विलास लांडे पाटील, पिंपरी चिंचवड पालिकेचे नगरसेवक विक्रांत लांडे पाटील, माजी उपमहापौर नितीनअप्पा काळजे, नगरसेविका आशा सूर्यवंशी ,नगरसेवक शांताराम भालेकर, प्रवीण भालेकर, पिंपरी चिंचवड स्थायी समिती अध्यक्ष विलास मडीगेरी, उद्योजक बाळासाहेब कदम, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर फुगे, माजी नगरसेवक शाम अग्रवाल, उद्योजक गजानन गुळवे, उद्योजक उदय कदम, अनिल मेहता, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेविका विनया तापकीर, किर्लोस्कर कंपनीचे चीफ मॅनेजर दयानंद जाधव, आर्किटेक्चर दयानंद शिंदे, यशोदा शिक्षण संस्थेचे दशरथ सगरे, उस्मानाबादचे सामाजिक कार्यकर्ते सरकार निंबाळकर, उद्योजक विनीत पाटील, विंग कमांडर शिवकुमार रांदड, एआरडीइचे डायरेक्टर यमुना रांदड, उद्योजक दामाजी आसबे, भगवान गाडे, कल्पेश भोज,ज्योतिषीचार्य दत्तात्रय अत्रे, पिंपरी चिंचवड चार्टड अकाउंट संघटनेचे अध्यक्ष बबनराव डांगळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, अक्कलकोटमधून बाळासाहेब मोरे, विश्वनाथ भरमशेट्टी, आणप्पा अळळीमोरे, राजू इनामदार, लिंबराज पाटील, आप्पासाहेब पाटील, अशोक काळे आदींसह सुंदरवाडी, किणी, कुरनूर, चुंगी,पालापूर, हनुर, काझीकणबस,
किणीवाडी, इंदापूर, पिंपरी चिंचवडमधील शैक्षणिक, सामाजिक, उद्योग क्षेत्रातील मान्यवर हजारो वऱ्हाडी मंडळी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.

नेटक्या नियोजनबद्ध विवाह सोहळ्याची उपस्थितांमध्ये चर्चा

लग्न म्हटले की उत्साहाला मोल नसतो पण एखाद्या मुलीचे स्वप्नवत स्वप्न पूर्ण करावे,ही प्रत्येक वडिलांची इच्छा असते. ते स्वप्न जाधव यांनी पूर्णपणे पार पाडलेले आहे. त्यांच्या या नेटक्या नियोजनबद्ध विवाह सोहळ्याची उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!