---Advertisement---

दत्त जयंती निम्मित कुरनूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Follow Us:
---Advertisement---

कुरनूर दि.७ : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अशी माहिती समितीचे अध्यक्ष मारुती बावडे यांनी दिली आहे.

बुधवारी सकाळी ८ ते १२ वाजे पर्यंत जय भवानी भजनी मंडळ आयोजित भव्य भजनाचा कार्यक्रम होईल, त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री दत्तात्रयांच्या मूर्तीचा अभिषेक होईल. त्यानंतर सर्व भाविकांच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रयांचा पाळण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून परत रात्री आठ वाजता पुन्हा जय भवानी भजनी मंडळ भजन करून मोठ्या भक्तीमय वातावरणात या जयंतीची सांगता होईल.

या दत्त जयंतीमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी व पुजारी धोडींबा धुमाळ यांनी केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!