ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम

मुंबई : वृत्तसंस्था

शिवसेना (ठाकरे) नेते आणि आघाडीतील समन्वयक संजय राऊत जागावाटपाबाबत खोटे बोलत असल्याचा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केला. राऊतांनी त्याचे खंडन करत मी काय खोटे बोललो ते सांगा म्हणत आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले. यामुळे आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून बिनसलेले असल्याचे समोर आले आहे.

भाजपविरोधात राज्यात शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्या असलेल्या महाविकास आघाडीत वंचितला सामावून घेतले गेले आहे. मागील महिनाभरापासून लोकसभेच्या जागावाटपाबाबत त्यांच्यात बैठकांचा सिलसिला सुरू केला. मात्र अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही, असे सांगत वंचितच्या आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील नेते सर्व चर्चा सुरळीत सुरू असलेला करत असलेला दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. आघाडीत सामील होण्यासाठी विविध मुद्दे असलेला प्रस्ताव पाठवला. वंचितची सुरुवातीपासून भूमिका त्यामध्ये मांडली. बैठकीत यावर निर्णय घ्यावा, अशी वारंवार मागणी केली. परंतु आघाडीत अद्याप एकमत झालेले नाही. उलट १५ जागांवरून आघाडीत तीन पक्षांमध्ये वाद रंगला आहे, असे आंबेडकर यांनी हा दावा करताना म्हटले आहे. सकारात्मक जागावाटपाचा दावा करणाऱ्या राऊत यांच्या भूमिकेवरही त्यांनी संशय घेतला आहे. आघाडीत काहीही आलबेल नसताना, राऊत खोटे बोलत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांना पत्रव्यवहार करत जागावाटपावर तोडगा काढावा, असे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!