ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात आता ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोसला प्राधान्य – आरोग्य मंत्री

मुंबई : राज्यात लसींचा तुटवढ्यामुळे मोठा निर्णय घेण्यात आली आहे. राज्यात उद्यापासून लसीचा पहिला डोस पूर्णत: थांबवण्यात येणार आहे. पहिला डोसचा तूर्तास अपेक्षा करू नका असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. राज्यात लसीकरणासाठी केवळ ४५ वर्षांवरील दुसरा डोस असलेल्याना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. केंद्र सरकारकडून पुरेसे लस उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आली आहे असे ते म्हणाले.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसींच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कॅबिनेटच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकऱण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!