मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून नुकतेच महाविकास आघाडीचे नेते शरद पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार म्हणाले कि, हे सरकार बहिणींना 1500 रुपये देणार आहे. पण बहिणींची अब्रू वाचविण्याची गरज आहे. बहिणींचा सन्मान राखला जावा, त्याकडे या सरकारचे मुळीच लक्ष नाही. महाराष्ट्रात गुंडगिरीचे राज्य सुरु आहे. सत्तेचा गैरवापर सुरु आहे. काखाने, सहकार चळवळी यांच्यासाठी या सरकारने काहीही काम केलं नाही. तसंच रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या नाहीत. मागच्या 10 वर्षांत देशाचा विकास झालेला नाही, असे म्हणत राज्य सरकारवर निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले की, सरकार लोकांच्या सेवेसाठी आहे, सत्तेचा माज काहींच्या डोक्यात आला आहे. सत्तेचा उन्माद आहे, त्यांना जागा दाखविण्याचे कामं या निवडणुकीत करायचे आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीचा अधिकार आपणास दिला आहे. परंतु या लोकांना सत्तेचा उन्माद चढला आहे. त्यांना आता खड्यासारखे बाजूला काढा. या निवडणुकीत ती संधी तुम्हाला आहे.
शरद पवार म्हणाले की, आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी यांच्याविषयी काहीही आस्था नाही. मी दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून काम केलं आहे. त्यावेळी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. मी 10 वर्ष या खात्याचे काम पाहिलं आणि 2014 मध्ये मी त्या खात्याचं काम सोडलं. त्यावेळी मला सांगायला अभिमान वाटतो की, भारत देश 10 वर्षात जगातील गहू निर्यात करणारा दोन नंबरचा देश बनला. मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी आणली. कांद्याला भाव मिळाला नव्हता. कांदा उत्पादक शेतकऱ्याने कष्टाने पिक घेतलं. त्यानंतर निर्यातबंदी करण्यात आली. गहू, तांदूळ याबाबत हे घडलं. जे पिकवाल त्या धान्यावर, उत्पादनावर निर्यात बंदी. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे,असा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.