ध्यास विश्वसार्ह बातमीचा

व्यवसायाच्या बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल नाही !

आजचे राशिभविष्य दि.८ मार्च २०२५

मेष

श्रीगणेश म्‍हणतात की, आज स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवून नवीन काम सुरु कराल. केवळ तुमच्या कृतींवर लक्ष केंद्रित करा. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. इतरांकडून मदतीची अपेक्षा करू नका. भावंडांशी वाद निर्माण होण्‍याची शक्‍यता. घर आणि व्यवसायात योग्य समन्वय ठेवा. नकारात्मक विचारांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका.

 

वृषभ

श्रीगणेश सांगतात की, ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या आर्थिक योजना यशस्वी होतील. बहुतांश कामे योग्यरित्या पूर्ण कराल. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमचे निःस्वार्थ योगदान असेल. वैयक्तिक जीवनात कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका. तुम्ही व्यावसायिक कामांमध्ये व्यस्त राहू शकता. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करू नका. आरोग्याशी संबंधित लहान-मोठ्या समस्या उद्भवू शकतात.

 

मिथुन

श्रीगणेश म्‍हणतात की, तुमच्‍या संपर्कक्षेत्रात वाढ होईल. कोणतेही विशेष काम पूर्ण करण्यात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबासह खरेदीत तुमचा आनंददायी वेळ जाईल. सामान्य बाबींवरून शेजाऱ्यांशी वाद होण्‍याची शक्‍यता. मुलाच्या हालचाली आणि सहवासावर लक्ष ठेवणे महत्वाचे. व्यवसायाच्या बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी वेळ अनुकूल नाही. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. जास्त कामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.

 

कर्क

मागील गेल्या काही चुकांमधून धडा घेऊन तुम्ही तुमचे कामात सुधारणा कराल. चांगली बातमी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. एखाद्या शुभचिंतकासोबत न्यायालयीन खटल्याची चर्चा होऊ शकते. व्यवसायाचा ताण तुमच्या घरावर आणि कुटुंबावर येऊ देऊ नका. आरोग्य चांगले राहिल.

 

सिंह

श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहमान अनुकूल आहे, तुमचा वेळ सुज्ञपणे वापरा. तुमच्या क्षमतेने आणि प्रतिभेने तुम्ही काम योग्यरित्या पूर्ण करू शकाल. मालमत्तेशी संबंधित कोणताही प्रश्न सुटण्याची शक्य. दिखाऊ वर्तनामुळे चुकीचा खर्च करू नका. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. एखाद्याशी वाद घालणे तुमच्‍यासाठी नुकसाकारक ठरेल. कौटुंबिक कामांमध्ये तुमचा सहभाग घरातील वातावरण आनंदी ठेवेल.

 

कन्या

आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ विश्रांतीसाठी काढाल. मित्र किंवा नातेवाईकांबरोबर चर्चेतून समस्या सोडवता येतील. इतरांना तुमच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू देऊ नका. व्यवसायात कोणतीही नवीन योजना बनवण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. घरातील वातावरण आनंददायी राहिल.

 

तूळ

श्रीगणेश म्हणतात की, आज कुटुंबातील ज्‍येष्‍ठांच्‍या सल्ल्याचे पालन केल्याने तुम्हाला निश्चित यश मिळेल. एखाद्या सामाजिक सेवा संस्थेत तुमचे विशेष योगदान असू शकते. जवळच्या नातेवाईकांशी किंवा मित्रांशी मतभेद होऊ शकतात. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात काही बदल करायचे असतील तर वास्तुच्या नियमांचे पालन करा. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे उचित ठरेल. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

 

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमची कामाची पद्धत सुधाराल. कोणत्याही विशेष कार्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. अनावधानाने एखाद्याशी वाद होण्याची परिस्थिती असू शकते. चुकीच्या कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. याचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. मालमत्तेबाबत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार योग्य परिणाम मिळू शकतात. पती-पत्नीमध्ये लहान-मोठ्या समस्या उद्भवू शकतात. आरोग्य चांगले राहिल.

 

धनु

श्रीगणेश म्‍हणतात की, आज कोणतेही काम घाई करण्याऐवजी संयमाने करा; तुम्हाला योग्य परिणाम मिळेल. मुलांच्या समस्या सोडवण्यातही तुमचे विशेष योगदान असेल. शेजाऱ्यांशी कोणत्याही वादात अडकू नका. पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय राखला जाईल. आरोग्य चांगले राहू शकते.

 

मकर

श्रीगणेश सांगतात, तुमच्या दैनंदिन दिनचर्येव्यतिरिक्त काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. सामाजिक उपक्रमांमध्ये तुमच्या सल्ल्याला प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणे टाळा. तुमच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाईट बातमी ऐकून विचलित होऊ देऊ नका. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

 

 

कुंभ

घरात कोणत्याही चांगल्या कामांसाठी योजना असेल. वडीलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद नातेवाईकांवरही राहील. घाईघाईने आणि भावनिक निर्णय घेऊ नका. कोणत्याही प्रकारच्या संभाषणात किंवा बैठकीशी संबंधित कामांमध्ये संवाद साधताना योग्य शब्दांचा वापर करा, असा सल्‍ला श्रीगणेश सांगतात. पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. आरोग्य चांगले राहिल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!