मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात निवडणुकीची धामधूम सुरु असून दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या बैठका सुरु आहे. तर त्यांनी आता थेट गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिकांयचे जे तुम्ही गणिते केले ते सर्वच्या सर्व फेल गेले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये आलेला हा सर्वांत मोठा पश्चताप असणार आहे. मराठ्यांनी आता शहाणेहोण्याची गरज आहे. आचारसंहितेपूर्वी जर आरक्षण दिले नाही तर तुमची सगळी गणिते बिघडवून टाकेन असा इशारा त्यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, भाजप नेते देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीचा अनुभव घेत विधानसभेची आचारसंहिता लागू देणार नाही, ते निवडणूक पुढे ढकलतील किंवा मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी करतील ही 100 टक्के खात्री आहे. आज रुग्णालयातून डिस्चार्ज होण्याअगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला राजकारणात जायचे नाही, हेच आव्हान मी भाजप आमदार, खासदार, मंत्री अन् सामान्य मराठा समाज या सर्वांना एकच आव्हान केले आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या मागण्या आहेत त्या मान्य करा. उद्या माझ्यावरती कुणी नाराज व्हायचे नाही उलट जातवान मराठ्यांनी जर फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्या बाजहून उभेच नाही रहायचे, स्वत:च्या लेकराच्या बाजूने उभे रहायचे, जातवान मराठ्यांनी हे काम करायचे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आण त्यानंतर आम्ही राजकारण केले तर आमच्या कानाला धरा पण त्यांनी हे जर नाही केले तर माझा नाईलाज आहे. त्यांचे नेते त्यांना समजून सांगतील अजून 8 ते 10 दिवस वेळ आहे, त्यात काही होईल अशी आशा असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.