ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर समाजाच्या मनातून मुख्यमंत्री उतरतील ; जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असून नुकतेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची तयारी राज्यातील शिंदे सरकारकडून सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या आधीच महायुती सरकार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना मानणारा मराठ्यांचा मोठा वर्ग आहे. गॅझेट लागू झाल्याने सगळ्यांना फायदा होणार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी दगा फटका केला तर समाजाच्या मनातून मुख्यमंत्री उतरतील, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे.

हैदराबाद गॅझेट लागू करा, ही आमची आत्ताची मागणी नाही. तर मागील वर्षभरापासूनची मागणी आहे. ती लागू करण्याचा आता हालचाली सुरू झाल्या आहेत. हे महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांचे मोठे यश असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हटले आहे. शंभूराज देसाई यांनी तीन महिन्यापूर्वीच याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. आम्हाला सगेसोयरेंची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे देखील मनोज पाटील यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारा मराठ्यांचा मोठा वर्ग आहे. शिंदेंचे मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात असे मी आधी देखील म्हणालो होतो. मात्र इतरांचे ऐकूण मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय बदलायला नको. संभाजीनगरचे पालकमंत्री आणि खासदारांचे ऐकूण मुख्यमंत्र्यांनी दगा फटका करू नये. असा इशारा देखील मनोज जरांगे पोटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

यावेळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. राज्यात कुठेही काही झाले तर त्याला देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे जबाबदार असतील. हे दोन लोक राज्यांमध्ये दंगली घडवू इच्छित असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यांना राज्यात मणिपूर सारखी परिस्थिती तयार करायची इच्छा असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!