मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील सरपंच खुनाची चर्चा जोरदार सुरु असतांना नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी एक मोठा अंदाज व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
खा.बजरंग सोनवणे म्हणाले कि, वाल्मीक कराड सीआयडी ऑफीसला शरण आले तेव्हा जी गाडी त्यांच्याकडे होती यावरुन सध्या राजकारण तापले आहे. अजित पवार यांना अडकवण्याचा प्लॅन असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तर पुढे बोलताना म्हणाले की, वाल्मीक कराड ज्या गाडीने शरण होण्यासाठी सीआयडी ऑफीसला हजर झाले त्या गाडीचा मालक तिथेच होता. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने त्यांना तशी विचारणा देखील केली, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.
खासदार बजरंग सोनवणे पुढे बोलताना म्हणाले की, अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी ह्या गाडीचा मालक सीआयडी ऑफीसला होता का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माझा आरोप अजित पवारांवर नाही तर आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवर आहे.
बजरंग सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शरद पवारांनी भेट घेतली तेव्हा हा माणूस तिथे होता. अजित पवारांनी जेव्हा त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा तिथे होता. हा जो व्यक्ती आहे तो आमच्यावर वॉच ठेवून आरोपीला सर्व माहिती देत होता का?, असा सवाल सोनवणे यांनी उपस्थित केला. बजरंग सोनवणे म्हणाले की, एमएच 23 बीजी 2231 नंबरची गाडी कुणाची आहे हे बघा. तोच आरोपी मस्साजोगमध्ये अजित पवार आले तेव्हा तिथे उपस्थित होता. ताफ्यामध्ये कुणाची गाडी असते तिथे कोण सोबत आले हे अजित पवारांना माहिती नसेल. माझा त्यांच्यावर आरोप नाही बजरंग सोनवणेला प्रसिद्धी पाहिजे म्हणून मी हे काही बोलत नाही. बीडच्या लोकांनी मला निवडून देत प्रसिद्ध केले आहे. मला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालेली पाहिजे.