ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबईवर सायबर हल्ला झाला नाही; सरकारकडून चुकीची माहिती

मुंबई: मुंबईत १२ ऑक्टोंबर रोजी अचानक वीज गायब झाली होती. इतिहासात वीज गायब होण्याची ही पहिलीच घटना होती. दरम्यान हा चीनचा सायबर हल्ल्या होता असे सायबर सेलने म्हटले आहे अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. मात्र, याबाबत माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली बाजू मांडताना सरकारच्या अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी कुठलाही सायबर हल्ला झाला नसल्याचे केंद्राच्या ऊर्जा विभागाने म्हटले आहे असे बावनकुळे यांनी सांगितले.

मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे चिनी सायबर हल्ला असू शकतो, अशा आशयाचे वृत्त काही परदेशी माध्यमांनी दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज खंडित झाल्यानंतर ऊर्जा विभागाने सायबर हल्ल्याची शक्यता वर्तविली होती. त्यानंतर सायबर सेलने स्काडा सिस्टीमच्या माध्यमातून केलेल्या तपासणीत तो सायबर हल्ला असल्याचे निष्पण्ण झाले आहे. परदेशी अकाउंटमधून आठ जीबी डाटा राज्य विद्युत मंडळाच्या सर्व्हरमध्ये पाठविला; तसेच, प्रतिबंधित खात्यांतून विद्युत मंडळाच्या सर्व्हेमध्ये लॉग इन करण्याचाही प्रयत्न झाला आहे. शिवाय, १४ ट्रोजन हार्सेस सर्व्हरमध्ये टाकले असावेत, असे अहवालात म्हटल्याचे देशमुख यांनी सांगितले होते. त्यानंतर, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वृत्त फेटाळले असून अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!