ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…म्हणून आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप नेहमीच सुरु असतांना आता देशावरील असलेल्या या संकटाच्या काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जो काही निर्णय घ्यायचा तो सरकारच घेत असते. मात्र आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सर्व पक्षीय बैठकीत देखील हाच सूर असतो. मात्र, या काळात विरोधी पक्षाने दिलेल्या सूचनांचे पालन देखील सरकारने करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

देशात इतर अनेक विषयांवर एक किंवा दोन दिवसांवर अधिवेशन बोलावले जाते. त्याच पद्धतीने काश्मीरच्या प्रश्नावर देखील दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावायला हरकत नाही, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामध्ये विरोधकांच्या सूचना किंवा एकंदरीत राष्ट्राची भावना त्यावर चर्चा घडवून देशाच्या सर्वच पक्ष्यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळायला हवी, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

काश्मीर आणि मणिपूर हे अत्यंत धगधगते प्रश्न आहेत. या प्रश्नावर आम्हाला बोलू दिले पाहिजे. संविधानावरील अधिवेशनातील चर्चे दरम्यान काश्मीरवर बोलण्यास फार कमी वेळ मिळाला. या विषयावर हिंदू – मुसलमान राजकारण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्याबद्दल देशवासीयांचे आभार मानायला हवे. मात्र या सर्व विषयावर संसदेमध्ये चर्चा झाली तर त्यामुळे सरकारला चांगली दिशा मिळेल, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सर्व पक्षीय बैठकीला कोण जाणार? याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. अरविंद सावंत हे एका मीटिंगसाठी बाहेर गेलेले आहेत. मात्र मी अशा मिटिंगला जात नाही. मी फार आक्रमक बोलतो. त्यामुळे मी अशा बैठकांना जाणे टाळतो. मात्र, आमचा प्रतिनिधी नक्कीच उपस्थित राहील. एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना आणि संवेदना या सरकार सोबत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!