ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पवनचक्की प्रकल्पात पहाटेच्या सुमारास शिरले चोर : गोळीबारात एक ठार !

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्हा नेहमीच वेगवेगळ्या घटनेने चर्चेत येत असतांना आता महाजनवाडी येथे असलेल्या ओटू‎कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात शुक्रवारी पहाटे १५ ते २०‎चोरटे शिरले. सुरक्षा रक्षकाने हटकल्यावर चोरट्यांनी‎त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरक्षा‎रक्षकाने आपल्या पिस्तुलातून २ राऊंड फायर केले, यात‎१ चोरटा ठार झाला. यानंतर चोरट्यांनी तिथून पळ‎काढला. शुक्रवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ही थरारक‎घटना घडली.‎

मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा पवनचक्की‎प्रकल्पांमुळे चर्चेत आहे. मस्साजोग येथेही पवनचक्की‎कंपनीला खंडणी मागितल्याचा प्रकार घडला. याला‎विरोध केल्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली‎होती, तर मावेजा आणि अडवणूक यामुळे शेतकरी व‎पवनऊर्जा कंपन्यांमध्येही सातत्याने वाद होत आहेत.‎त्यामुळे या कंपन्यांना सुरक्षा रक्षक नेमण्याच्या व‎सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या‎होत्या. बीड तालुक्यातील महाजनवाडी, लिंबागणेश‎शिवारात ओटू कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे. या‎प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी अॅक्टिव्ह पॉवर या‎सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीकडे आहे. या प्रकल्पावर‎रुपसिंग टाक (रा. पाटोदा) हे माजी सैनिक सुरक्षा रक्षक ‎‎आहेत. शुक्रवारी पहाटे १५ जे २० चोरटे कंपनीत शिरले. ‎‎त्यामुळे सुरक्षा रक्षक टाक यांनी त्यांना अडवले. मात्र ‎‎चोरट्यांनी त्यांच्यावर शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न ‎‎केला. यावेळी टाक यांनी पिस्तुलातून फायर केले.‎

सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात ठार‎ झालेला संशयित हा धाराशिव‎जिल्ह्यातील रहिवासी आहे.‎सायंकाळी उशिरापर्यंत त्याची‎ओळख पटवण्याचे काम सुुरु होते.‎त्याचे नातेवाईकही घटनास्थळी‎येण्यास घाबरत होते. त्यामुळे मृताचे‎नाव पोलिसांनी जाहीर केले नव्हते.‎ पवनऊजईा कंपन्या चोरट्यांच्या‎रडावर आहेत. बीड, पाटोदा, केज तालुक्यातील कंपन्यांमधून लाखो‎रुपयांचे काॅपर वायर व इतर साहित्य चोरी जात आहे. काही दिवसांपूर्वी‎आवादा कंपनीत चोरी करणारी टोळी बीड पोलिसांनी गजाआड केली होती.‎

नेकनूर पोलिसांना आधी सुरक्षा‎रक्षकानेच चोरीचा बनाव रचल्याचा‎ संशय आला. त्यामुळे पोलिसंानी‎सुरक्षा रक्षक टाकची कसून चौकशी‎सुरु केली. या चौकशीत त्याने‎गोळीबार केल्याची माहिती दिली.‎त्यानंतर पोलिसंानी पुन्हा पाहणी‎केली, त्यावेळी मृतदेह आढळला.‎ या प्रकरणात चोरीचा प्रयत्न‎केल्याचा व खुनाचा असे दोन‎वेगवेगळे गुन्हे नोंदवले जाणार‎आहेत. सुरक्षा रक्षक टाक यांच्याकडे‎पिस्तुलाचा परवाना असल्याचे ते‎सांगत आहेत. मात्र आम्ही त्याची‎खात्री करत आहोत. आताच मृताचे‎नाव सांगता येणार नाही.‎

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!