ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्रात उद्योग येऊच नये, यासाठी तर महाविकास आघाडीकडून ही बदनामीची मोहीम नाही ना – देवेंद्र फडणवीस

मुंबई : सद्या राज्यातील काही प्रकल्प इतर राज्यात गेल्यावरून सत्ताधारी आणि विरोधिकामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. विरोध पक्षातील नेत्यानी केलेल्या आरोपाना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत महावीकास आघाडीच्या नेत्यानी केलेल्या सर्व आरोप खोडून काढले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे सरकार येऊन फक्त तीन महिने झाले आहेत. असे असताना महाराष्ट्रातून उद्योग जात आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. त्यासाठी काही राजकीय पक्ष, HMV पत्रकार, त्यांची यंत्रणा यांनी मिळून महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातला आहे. महाविकास आघाडीच्या कारकिर्दीत भयानक कांड झाले. त्यामुळे महाराष्ट्रात येण्यास कोणीही तयार नव्हतं. महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास कोणीही तयार नव्हतं. ही विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस सांगितले.

केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची अधिकची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकल्पासह आगामी वर्षात राज्यात टेक्स्टाईल क्लस्टर उभारण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पाअगोदर या टेक्स्टाईल पार्कची घोषणा केंद्र सरकारकडून होण्याची शक्यता आहे. मुंबईत पत्रकार परिषदे बोलत असताना फडणवीस यांनी वरील माहिती दिली.

मी केंद्र सरकारचे आभार मानतो. आजच केंद्र सरकारने महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा केली आहे. आगामी काळात महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्वाधिक गुंतवणूक आणि रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही एक भेटच आहे. नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून टेक्सटाईल पार्कदेखील मिळणार आहे. यातून महाराष्ट्रात टेक्स्टाईल पार्क उभा राहण्यास मदत होणार आहे. याचं प्रपोजल अंतिम टप्प्यात आहे. मी त्याची माहिती घेतली आहे. नवीन वर्षात आर्थसंकल्प सादर होईपर्यंत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!