ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चांगले काम करणाऱ्यांचा गौरव झाला पाहिजे : आमदार कल्याणशेट्टी; अक्कलकोट पंचायत समितीच्या विविध पुरस्कारांचे वितरण

अक्कलकोट, दि.१४ : चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने तालुक्यात घरकुल बांधण्यासाठी उत्कृष्ट काम केलेल्या लोकांचा सत्कार माझ्या हातून होणे ही बाब इतरांसाठी प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. सोमवारी, अक्कलकोट पंचायत समिती सभागृहात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमानतेने काम केलेल्या विविध घटकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले,तालुक्यात कुपोषणाच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीने काम करण्याची गरज आहे. तालुका कुपोषण मुक्त झाला पाहिजे. त्यासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका तसेच बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच तालुका कुपोषण मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- प्रथम क्रं- ग्रामपंचायत सांगवी खु (गोसावी वस्ती), व्दितीय क्रं. ग्राम पंचायत गौडगांव  बु, तृतीय क्रं. ग्रामपंचायत शावळ, राज्य पुरस्कृत आवास योजना – सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- प्रथम क्रं- ग्राम पंचायत जेऊर, व्दितीय क्रं. ग्रामपंचायत कडबगांव, तृतीय क्रं- ग्रामपंचायत कुरनूर,प्रधानमंत्री आवास योजना ग्रा, सर्वोत्कृष्ट घरकुल- प्रथम क्रं- विश्वनाथ बसण्णा तानवडे ( शिरवळ) क्रं – भिमराव श्रीमंत पाटील (रा.केगांव खु), तृतीय क्रं- महादेवी सोमनिंग व्हनमाने (रा.हंजगी) राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट घरकुल- प्रथम क्रं- काशिनाथ बम्मण्णा मोची (रा. जेऊर), व्दितीय क्रं – विजयकुमार शिवकुमार बनसोडे (रा. कडबगांव), तृतीय क्रं- लक्ष्मण भागवत केंगार (रा. कुरनूर)
प्रधानमंत्री आवास योजना ग्रा.सर्वोत्कृष्ट क्लस्टर- ग्रामपंचायत-मिरजगी,राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोत्कृष्ट क्लस्टर- ग्रामपंचायत सांगवी खू (कोळीबेट) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

बाल दिनाचे औचित्य साधून बालकांची तपासणी करण्यात आली व सायकल बँक अंतर्गत २४ ग्रामीण भागातील मुलींना प्रतिनिधिक स्वरूपात सायकल वाटप करण्यात आले.तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड हे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. कार्यक्रमात आहार तज्ञ सोनाली घोंगडे समतोल आहारविषयक मार्गदर्शन केले.

यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, गट शिक्षण अधिकारी कुसुदीया शेख,पशुधन विकास अधिकारी डॉ.दिनेश मुरूमकर,कृषी अधिकारी उमेश काटे,प्रशासनाधिकारी मेघराज कोरे,कनिष्ठ प्रशासनाधिकारी दयानंद परिचारक, सिद्धया मठ,रेवण बोरगाव, विनायक जाधव हनुमंत कोरे, राजू निकम आदींसह सर्व पंचायत समिती कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका,आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!