ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भर रस्त्यावर थरार : चारशे रुपयांसाठी महिलेला पेट्रोल टाकून पेटविले !

सोलापूर : वृत्तसंस्था

माढा तालुक्यातील पडसाळी येथे चारशे रुपयांच्या देवाणघेवाणीवरून चाळीस वर्षीय महिलेला तिघांनी रस्त्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला ५० टक्के भाजली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शोलेबाई समिंदर काळे (रा. भेंड ता माढा) असे पिडीत महिलेचे नाव आहे. मीना संज्या काळे, मंगल पवार, दीपक पाटील (सर्व रा. कुर्मदास साखर कारखाना पडसाळी ता. माढा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोलेबाईकडून आरोपी मीना संज्या काळे, मंगल पवार यांच्याकडून ४०० रुपये येणे होते. पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीस या अगोदरही शिवीगाळ केली होती. घटनेच्या वेळी दोन्ही आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करून सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर टाकून काडीपेटीतील काडी ओढून पेटवून दिले. त्यानंतर तिघेजण मोटरसायकलवरून निघून गेले. शोलेबाई यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!