मुंबई : वृतसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असतांना नुकतेच जरांगे पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मराठा समाजासाठी एखादा निर्णय जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेत असतील आणि मी त्याला विरोध केला असेल असे त्यांनी सांगितले तर त्याच वेळी पदाचा राजीनामा देईल. इतकेच नाही तर राजकारणातूनही संन्यास घेईल. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनीही पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. तरी ते सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. फडणवीस त्यांच्याविषयी गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप करत आहेत.
मात्र, तो आरोप चुकीचा असल्याचेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनीच रोखले आहे, हे नाकारता येणार नाही. तसे नसते तर सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. हे तुम्हाला नाकारून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मुलांवर एक लाखापेक्षा जास्त खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत. माझ्यावर देखील तीन गुन्हे कालच दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. मुंबईला जाताना गेवराईतून गेल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मग गेवराईतून जायचे नाही तर कुठून जायचे? असा प्रश्न जरांगे पाटील यांनी विचारला आहे.