ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार प्रताप सरनाईक ‘कनेक्शन’; ‘एमएमआरडीए’ आयुक्तांना ईडीची नोटीस

मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान आता आमदार प्रताप सरनाईक यांचे टॉप्स सिक्युरिटी प्रकरणाशी मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांचे संबंध समोर आले आहे. त्यामुळे एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांना ईडी (सक्तवसुली संचलनालय)ने समन्स बजावले आहेत. या प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग यांचीही ईडीने चौकशी केली आहे. आता एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनाही ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे.

टॉप सिक्युरिटी या खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीला कंत्राट देताना गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या कंपनीच्या संचालकांनी परदेशी रक्कमेचा अपहार केल्याने त्या सबंधितांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. त्यात आता आर.ए. राजीव यांचीही चौकशी होणार आहे. या प्रकरणात आता नवीन काय खुलासे होणार? याकडे लक्ष लागले आहे.

यापूर्वी या प्रकरणात दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा नातू व बॉलिवूड अभिनेता अरमान जैन याला देखील समन्स बजावले आहेत. अरमान जैन आणि विहंग सरनाईक यांचे एकमेकांशी संबंध असल्याचा ईडीचा संशय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!