ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी साधला संवाद, ईडीने पाठविलेल्या नोटिस संदर्भात दिली “ही” प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने आज नोटीस पाठवले आहे. त्यांना मंगळवारी सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर ट्विट करून माहिती दिली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही मिनिटांपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ईडीने पाठविलेल्या नोटीस संदर्भात प्रश्न विचारले असता अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल परब म्हणाले की, ‘आज संध्याकाळी आपल्याला नोटीस मिळाली आहे. मात्र त्यामध्ये कोणताही विशेष उल्लेख नाही. नोटीस नेमकी कशासाठी हे मला कळले नाही. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर दिले जाईल असे अनिल परब यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!