ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ट्रॅव्हरला लागली अचानक आग : चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे येथील हिंजवडी फेज वनमध्ये आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हरला अचानक आग लागल्याने ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत ट्रॅव्हरलमधील चार कर्मचाऱ्यांचा होरपळून जागीच मूत्यू झाला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील फेज वनमध्ये व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेून जाणारी ट्रव्हलर गाडी दाखल झाली. या ट्रॅव्हरलमध्ये १२ कर्मचारी होते. अचानक चालकाच्या पायाखाली आग लागली. ही बाब त्याच्या लक्षात येताच चालक आणि समोरील कर्मचारी गाडीतून तातडीने बाहेर पडले. मात्र, वाहनाचा मागचा दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या ट्रॅव्हरलच्या इंजिनमध्ये बिघाड असल्याने ही आग लागल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्देवी घटनेत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले आहे.

नेमकं काय घडलं?

हिंजवडी तील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस आणि हिंजवडी एमआयडीसी व पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत जळालेले मृतदेह बाहेर काढले. ही भयावह घटना बुधवारी सकाळी 8 वाजता घडली. हिंजवडी विप्रो सर्कलच्या पुढे फेज 2 कडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. हिंजवडीतील फेज 2 ला क्रोमा शोरूमच्या मागील बाजूला असलेल्या वियोमा ग्राफीस या प्रिंटिंग प्रेसमध्ये ही बस चालली होती. या ट्रॅव्हलरमध्ये 12 ते 13 प्रवासी होते. हिंजवडीत ही ट्रॅव्हलर आली असताना अचानक बसच्या इंजिनने पेट घेतला. यावेळी खूप मोठा धूर झाल्याने चालकाच्या लक्षात आले. त्याने बसमधून उडी मारली व बसचा दरवाजा लॉक झाल्याने कामगारांना बाहेर पडता आले नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group