अक्कलकोट, दि.२२ : मनीषा ऍग्रो सायन्सचे प्रमुख उमेश पाटील यांचे पुत्र उदय पाटील हे कृषी विषयक उच्च शिक्षणासाठी नेदरलँडला रवाना झाले आहेत.यानिमित्त त्यांचा मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत सध्या त्यांचे शिक्षण सुरू आहे.बारावी पर्यंतचे त्याचे शिक्षण संगमेश्वर कॉलेज सोलापूर येथे झाले आहे.ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट हा चार वर्षाचा कोर्स आहे दोन वर्ष त्यांनी कॉलेज ऑफ ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट बारामती
येथे पूर्ण केले आहेत.त्यानंतर नेदरलँड विद्यापीठाच्या पूर्व परीक्षेत त्यांनी विशेष प्राविण्य मिळविल्याने पुढील दोन वर्षाच्या शिक्षणासाठी त्याची या विद्यापीठासाठी
निवड झाली आहे.राहुरी विद्यापीठाचे व्हीएचएल नेदरलँड युनिव्हर्सिटी सोबत टायप आहे.बीएस ऍग्रीप्रमाणे हा एक
कोर्स आहे बिझनेस ओरिएंटड ही पदवी आहे एखादी कंपनी उभी करण्यासाठी हा कोर्स फायदेशीर ठरणार आहे.
भविष्यकाळात मनीषा ऍग्रो सायन्सेसचे प्रोडक्ट निर्यात करणे किंवा कंपनीच्या विस्तारासाठी या शिक्षणाचा खूप मोठा
फायदा होणार आहे,असे उदय पाटील यांनी सांगितले.विशेष म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी हा कोर्स फायदेशीर आहे.यातून इंटरनॅशनल एक्सपोझर आहे भारतामध्ये खूप कमी
जणांना याची माहिती आहे.भविष्यात याला खूप मोठा स्कोप आहे,असे पाटील यांनी सांगितले.यानिमित्त सोलापुरात आशित शहा,सुहास कानडे आदींनी त्याचा सत्कार केला.या निवडीबद्दल शिवशंकर भंगे,महेश पाटील,बसवराज बाणेगाव,ज्ञानेश्वर कदम,सुरेश सुरवसे यांच्यासह चपळगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.