मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात दररोज नवनवीन चर्चा समोर येत असतात. आज बुधवारी १७ रोजी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, त्यामुळे राजकारणात नवीन चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झाल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे वर्षावर आले होते. तिथे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये उदयनराजेंनी शरद पवार तसेच काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उदयनराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने त्यांची ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजे भोंसले यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपात प्रवेश केल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.