ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठकांचे सत्र

मुंबई वृत्तसंस्था 

मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून ‘शिव सर्वेक्षण यात्रा’ सुरू करण्यात आली होती. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे सादर केला. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी वॉर्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे .

जानेवारी महिन्यापासून उद्धव ठाकरे हे सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. मात्र तत्पूर्वी 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू होणार असून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठका होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबर पर्यत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. विधानसभा निहाय या बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत. यापूर्वी 21 डिसेंबरला मुंबईतील निरीक्षकांची बैठक झाली होती, त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार असल्याचे समजते.

विधानसभा निवडणूकीच्या निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभा निहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती . त्यानंतर या निरीक्षकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीत अहवाल सादर केला होता.

आगामी मुंबई महानगर पालिका ही ठाकरे गटाने स्वबळा लढावी असं पदाधिकाऱ्यांच म्हणणं आहे. याच पार्श्वभू्मीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत. या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार असून जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.

 

पदाधिकारी आढावा बैठकांच्या तारखा 

 

26 डिसेंबर – बोरिवली विधानसभा , दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा

27 डिसेंबर – अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा

28 डिसेंबर – मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द – शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा

29 डिसेंबर – धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुबादेवी, कुलाबा

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!