समाजकारण आणि राजकारणामध्ये अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात पण दिलेल्या शब्दाला जागणारा आणि एखाद्या विषयावर दूरदृष्टीकोन ठेवून सातत्याने त्याविषयी पाठपुरावा करणारा नेता हा दुर्मिळ असतो आणि ही माणसे समाजात आपले स्थान पक्के निर्माण करतात आणि त्यांचा लौकिक सर्वत्र पसरतो.यापैकीच एक अक्कलकोट तालुक्याला लाभलेले बहुआयामी, विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणून उद्योजक म्हणून चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे. समाजात काही लोकांचा जन्म हा लोकांच्या उद्धारासाठीच होतो याचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहिल्यावर येतो.केवळ चपळगाव नव्हे तर या संपूर्ण परिसराचा कायापालट हेच स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.मित्र म्हणून याचा मला अभिमान वाटतो.आज मनीषा ऍग्रोच्या माध्यमातून उमेश पाटील हे तालुक्याला नव्हे तर जिल्हयाला आणि राज्याला सुपरिचित झाले आहेत.घरची परिस्थिती तशी बरीच होती.कारण वडील शेतकरी नेते के.बी.पाटील हे माध्यमिक शिक्षक होते. जुन्या काळातील पाटील घराणे एकत्र कुटुंब असल्यामुळे सदस्यांची संख्या जास्त.त्यांचे बंधू सरपंच कै.संतोष पाटील हेही इंजिनिअर होते.उमेश पाटील हे १९९७ साली डी.फार्मसी व पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी चपळगाव सोडले. सोलापूरला आले कष्ट करण्याची जिद्द आणि प्रगतीची धडपड मनाशी बाळगून सोलापूर येथे त्यांनी एस.टी.स्टँड जवळ मनीषा ऍग्रो सिंडीकेट हे रिटेल दुकान घातले .शेतीला लागणारी औषधे, खते,बी-बियाणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला.असे करत असतानाच त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पत्नी रोहिणी ह्या सहचरणी म्हणून आल्या. व्यवसायात हळूहळू जम बसला. आता रिटेल दुकानाचे रूपांतर होलसेल शॉपमध्ये झाले. म्हणूनच त्यांनी मनीषा ॲग्रो सिंडीकेटच्या शाखा बार्शी, पंढरपूर, अकलूज या ठिकाणीही होलसेल विक्रीचे दुकान चालू केले.खरे पाहिले तर उमेश पाटील यांची जिद्द ही जगावेगळी आहे.लोक जे जमत नाही म्हणतात ,ते करून दाखवण्याची जिद्द त्यांच्या मनात असते. त्यांना शेती व शेतकरी हे विषय देखील खूप जिव्हाळ्याचे वाटतात. म्हणून त्यांनी २००६ साली शेतीसाठी लागणारे खते, औषधे व बी-बियाणे निर्माण करण्यासाठी मनीषा ॲग्रो सायन्सेस अशी स्वतःची कंपनी जन्मभूमी चपळगावमध्ये बेरोजगारांना काम मिळावे म्हणून चपळगाव व सोलापूरच्या चिंचोळी एम.आय.डी.सीमध्ये अशा दोन ठिकाणी सुरू केली.या संपूर्ण व्यवसायाच्या वृद्धीमध्ये त्यांच्या पत्नी रोहिणीताई यांचा सिंहाचा वाटा आहे.कारण त्या देखील घरच्या कुठल्याच जबाबदाऱ्या त्यांना दिलेल्या नाहीत.कुठल्याही कामाची सुरुवात ते स्वतःपासून करतात,हे फार महत्वाचे आहे. चपळगाव येथील कारखान्यात पन्नास आणि सोलापूरच्या एम.आय.डी.सी. कारखान्यात पन्नासपेक्षा अधिक लोक कामगार आहेत. याव्यतिरिक्त कंपनीच्या क्लार्क पासून ते सेल्स मॅनेजर पर्यंत जवळपास ८० ते ९० जणांचा विश्वासू व कर्तव्यतत्पर स्टाफ त्यांच्याकडे आहे.त्यांच्या या अभ्यासू वृत्तीमुळे आणि प्रामाणिकतेमुळे व्यवसायाचा विस्तार महाराष्ट्र बाहेर गेला आहे.सध्या कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात,राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये देखील आता व्यापार सुरू केला आहे .शेतकऱ्याला गुणवत्ता पूर्ण बियाणे आणि खते देणे त्यातून त्यांचे उत्पादन वाढवणे ही त्यांची भूमिका कायम आहे. त्यासाठी ते अपार कष्ट घेतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्वत्र लक्ष ठेवतात, इतकेच नव्हे तर या साऱ्या कारभारामध्ये पाटील परिवाराची तर प्रगती तर झालीच,पण त्याचबरोबर गाव व पंचक्रोशीसाठीही आपले योगदान देत असतात .त्यांनी सामाजिक कार्य म्हणून रक्तदान, आरोग्य शिबिर,पशुचिकित्सा शिबिर, शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, पूरग्रस्त व आपत्तीच्या वेळेला शेतकऱ्यांना मदत कार्य गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपक्रम अशी अनेक कामे त्यांनी केली.शिक्षण असेल तर सर्वांगीण विकास ह्या ध्येयाप्रती चपळगावमध्ये संतोष दादा पाटील मराठी विद्यालय, आणि रीणाति इंग्लिश मीडियम स्कूल या शाळा आधुनिक पद्धतीने,सुस्थितीत चालवल्या जातात. आता पुन्हा तालुक्यात इमारत नाही अशा पद्धतीची भव्य इमारत उभी करून हा संपूर्ण परिसर शैक्षणिक दृष्ट्या अद्ययावत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.सरपंच म्हणून ही त्यांनी अनेक कामे आदर्शवत आहेत. लोक राजकारणात पैसे कमवण्यासाठी येतात असा समज असतो पण स्वतःच्या कष्टाचे पैसे घालून गावाचा विकास करण्यात हे नेहमी अग्रेसर आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. शेती ,शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीचा अवलंब त्यांनी ग्रामविकासासाठी चालविलेला आहे.ते नेहमी असे म्हणतात की,या उत्पादनातून पैसे कमावणे नाही तर चांगले पीक येऊन शेतकऱ्याला पैसे मिळवून देणे हा आमचा मूळ उद्देश आहे.त्यांच्या या चांगल्या स्वभावामुळे ते आज चपळगाव भागात राजकारणात एक लोकप्रिय असे व्यक्तीमत्व म्हणून परिचित झाले आहेत. अतिशय प्रामाणिक,निस्वार्थी, निगर्वी, मेहनती,सुस्वभावी,संयमी,दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांच्या या गौरवशाली जीवनकार्याचा आम्हाला तर गौरव आहेच आणि सार्थ अभिमान देखील आहे.सन्मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
ज्ञानेश्वर कदम,चप्पळगाव