ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्योजक उमेश पाटील यांच्याकडे प्रत्येक गोष्टींचे व्हिजन : दत्ता शिंदे;वाढदिवसानिमित्त चपळगाव ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार

 

अक्कलकोट, दि.१८ : मनीषा ऍग्रोचे सर्वेसर्वा उमेश पाटील हे चपळगावच नव्हे तर अक्कलकोट तालुक्याला लाभलेले
एक अनमोल रत्न आहे त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचे व्हिजन आहे म्हणून ते आज आपल्या उद्योगधंद्यामध्ये यशस्वी
आहेत,असे गौरवोद्गार गोकुळ शुगरचे अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी काढले.चपळगावचे माजी सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॉबी ग्रुपचे
अध्यक्ष अजित गायकवाड हे होते.व्यासपीठावर माजी नगरसेवक अरुण भालेराव,दिलीप सिद्धे,कार्तिक
पाटील,बसलींगप्पा खेडगी,सागर कल्याणशेट्टी,बसवराज बाणेगाव,अंबणप्पा भंगे,प्रशांत अरबाळे,आप्पासाहेब पाटील,के.बी.पाटील,दिपक पाटील,सिद्धाराम भंडारकवठे,महेश पाटील,सुमन पाटील,रोहिणी पाटील,गंगाधर
कांबळे,महादेव चव्हाण,ब.रे. हिरेमठ,मनोज इंगुले, महादेव वाले,ज्ञानेश्वर कदम,सुरेश सुरवसे आदी मान्यवरांची
उपस्थिती होती.पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,उद्योग,शेती ,राजकारण समाजकारण, शिक्षण या सर्व क्षेत्रात
त्यांनी घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.चपळगावासींयानी देखील त्यांच्यावर खूप प्रेम केलेले आहे आहे.शिंदे परिवार
आणि पाटील परिवार यांचा खूप जुना संबंध आहे त्यांचे वडील के.बी पाटील हे सुद्धा खूप संस्कारी व्यक्तिमत्व होते
म्हणून आज उमेश पाटील यांच्या सारखे व्यक्तिमत्व जिल्ह्याला एक चांगले व्यक्तिमत्व पुढे आलेले आहे.गोकुळ
परिवार नेहमी त्यांच्या चांगल्या गोष्टीशी पाठीशी राहील,अशी ग्वाही त्यांनी दिली.बाणेगाव म्हणाले,सरपंच उमेश
पाटील यांच्या माध्यमातून गावात अडीच कोटींची विकास कामे झाली आहेत पुढील अडीच वर्षात देखील भंडारकवठे यांच्या माध्यमातून देखील अडीच कोटीची काम होतील.भंडारकवठे यांनी देखील उमेश पाटील हे मित्र म्हणून कसे चांगले आहेत आणि ते कसे राजकारणात पुढे आले यासंबंधी गौरवपर उद्गार काढत पाटील यांच्या
कार्यकर्तृत्वाची प्रशंसा केली.दिलीप सिद्धे,भालेराव,गायकवाड,महेश पाटील,मनोज इंगुले यांचीही भाषणे झाली.सत्काराला उत्तर देताना,उमेश पाटील म्हणाले,मनीषा परिवार असेल किंवा व्यक्तिगत पाटील
परिवार असेल हे कधी कुणावर अन्याय केलेला नाही.पुढेही करणार नाही.केवळ समाजाचा सर्वांगीण विकास आणि उद्योग व्यापारावर भर देण्याचे काम सुरू आहे. आमच्यावर चपळगाववासीयांनी मोठे प्रेम केले.शक्य तितके विकास कामे गावात केली यापुढेही चोवीस तास गावाच्या सेवेत
मी उपलब्ध आहे. कधीही मागे हटणार नाही.असेच प्रेम आणि सहकार्य आणि आशीर्वाद पाठीशी कायम राहावे,अशी
अपेक्षा व्यक्त केली.भाषणानंतर पाटील यांनी सपत्नीक मोठा केक कापला.यानंतर क्रेनने भला मोठा हार घालून
त्यांचा बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला.यावेळी संतोष नगर मित्र मंडळ, श्री बसवेश्वर
तरुण मंडळ (बसवनगर ),श्री बसवेश्वर तरुण मंडळ भंडारकवठे गल्ली, शिवप्रेमी तरुण मंडळ, महात्मा फुले तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, मधला मारुती तरुण मंडळ ,शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.दिवसभरातही राज्य, परराज्यातून मनीषा ऍग्रोशी संबंधित व विविध महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष महेश गजधाने, चिदानंद हिरेमठ, बापू गजधाने, राहुल गजधाने, अमर गजधाने ,परिक्षित चौगुले, बुद्धभूषण गजधाने, महेश आगावणे, अनिल पाटील, अमोल गजधाने,अंगुली गजधाने, सायबा गजधाने, ईश्वर
नारायणकर आदींसह ग्रामस्थांनी सहकार्य केले.सूत्रसंचालन रमेश स्वामी यांनी केले.

 

….म्हणून सरपंचपदाचा
राजीनामा दिला

राजकारणामध्ये अनेक जण दिलेला शब्द पाळत नाहीत.परंतु मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे.निवडणुका येत असतात आणि जात असतात. माणुसकी,मैत्री आणि विचार कधी सोडायचे नसतात. म्हणून ठरल्याप्रमाणे मी अडीच वर्षानंतर सरपंचपदाचा राजीनामा दिला.ज्या ज्यावेळी गावाला गरज पडेल त्यावेळी मी सदैव विकासासाठी कटिबद्ध आहे.सर्वांनी मिळून गावचा विकास करूया.

उमेश पाटील,माजी सरपंच

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group