ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरातील काँग्रेस भवन समोरील सुशिलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीने फेकली शाई

सोलापूर : सोलापुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवना समोर लावण्यात आलेल्या देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा बॅनरवर आज शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोराने शाई आणि दगडफेक फेकल्याने नव्या वादाला तोंड फुटला आहे. या दगडफेकीमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बॅनरवरील फोटो फाटला आहे. काँग्रेस भवन येथे हल्ला झाल्याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे धाव घेण्यास सुरुवात केली.

काँग्रेस भवनाच्या बाहेर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळेसह अन्य नेत्यांचे फोटो आहेत. या फोटोंवर शाई फेकून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या बॅनरवर नेमके कोणी शाई फेकले हे समजु शकले नाही.

सदर घटनेची माहिती मिळताच काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले काँग्रेस भवनात दाखल हो त्यांनी पहणी केली. ज्येष्ठ नेते सुनील रसाळे आणि काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी या घटनेचा निषेध नोंदवत काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहरांमध्ये सध्या चांगले काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना ते बघवत नाही, हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, लपून नाही, असे आव्हान दिले.

काँग्रेस भवन हे जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. याची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे हे घटनास्थळी जावुन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून हल्लेखोरांना पकडून कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!