---Advertisement---

रा. ना. पवार प्रतिष्ठानने दुर्मिळ ग्रंथसंपदा चुंगीच्या उत्कर्ष वाचनालयाकडे केली सुपूर्द

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : सोलापुरातील कविवर्य रा.ना. पवार प्रतिष्ठानने जपून ठेवलेली दुर्मिळ ग्रंथसंपदा चुंगीच्या उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयाकडे गुरुवारी सुपूर्द केली यात उत्तमोत्तम अशा 250 दर्जेदार ग्रंथांचा समावेश आहे.

कविवर्य रा. ना. पवार स्मृती प्रतिष्ठानकडे कवी रा ना पवार यांना तत्कालीन कवी, लेखक आणि साहित्यिकांनी अनेक ग्रंथ सप्रेम भेट दिलेले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजग्रह निवासस्थानाला भेट दिल्यानंतर बाबासाहेबांनी विकसित केलेले आपले समृद्ध ग्रंथालय पवार यांना स्वतः दाखवले. त्यातील काही पुस्तके भेट दिली आणि ग्रंथसंग्रह करण्याचा सल्ला दिला होता. त्याचे तंतोतंत पालन करीत कवी रा. ना.  पवार यांनी जीवनभर पुस्तकांचा संग्रह केला ही ग्रंथसंपदा योग्य ठिकाणी जावी , वाचकांना त्याचा लाभ मिळावा,  यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कवी माधव पवार यांचा प्रयत्न आहे. चुंगीच्या सार्वजनिक वाचनालयाला यातील दर्जेदार ग्रंथ देण्यात आले.

कविवर्य रा. ना. पवार यांच्या निवासस्थानी पुस्तक प्रदान सोहळा पार पडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधव पवार यांनी उत्कर्ष वाचनालयाचे अध्यक्ष नारायण चव्हाण, सचिव सुरेश माने आणि संचालक बालाजी माने यांच्याकडे ही ग्रंथसंपदा सोपवली. यावेळी हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत येळेगावकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पद्माकर कुलकर्णी,  दत्ता थोरे,  प्रशांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!