मुंबईः कोकणात बुधवारी आणि गुरुवारी झालेल्या पावसामुळं खेड, महाड, चिपळूण परिसरात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. पुराचे पाणी जर ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप संकट कायम आहे. या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने कोकणच्या दौऱ्यावर निघाले आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित आहेत. नारायण राणे हे आज तळीये, चिपळूण या परिसराची पाहणी करणार आहेत. तसं ट्वीट राणे यांनी केलं आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत.@PMOIndia
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने मी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत. असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.