ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एका दिवसात स्वत:वरील केसेस कशा काढायच्या हे अजित पवारांकडून शिकावे, केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर साधला निषाणा

सिंधुदुर्ग: केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्ताने नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी नेहमी प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि सामनावर भाष्य केलं. सुड बुद्धिने कारवाई होत असतील तर मला उत्तर द्यावच लागेल,  अशा इशारा नारायण राणे यांनी यावेळी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राणेंवर टीका करताना निधी येत नसल्याचे म्हटले होते. अजित पवार यांच्या टिकेचा नारायण राणे यांनी आज समाचार घेतला. ‘अजित पवार अजून अज्ञान आहेत. आपल्या खात्याचं बघा. अजून मी राष्ट्रवादीकडे अद्याप वळलेलो नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला. ‘आपल्यावरील आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकलं पाहिजे,’ असेही नारायण राणे म्हणाले.

ओबीसी आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची बंद दारा आड चर्चा झाली होती. त्यासंदर्भात नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचरले असता त्यावरदेखील प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड नाही, तर उघडपणे चर्चा झाली, असे ते म्हणाले. तसेच कोणत्याही प्रकारची चर्चा झाली, तरी मला काहीही फरक पडत नाही, असे त्यांनी सांगितले.

जनआशीर्वाद यात्रेत मांजर आडवी गेली, असा घणाघात करत केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. जनआशीर्वाद यात्रेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, यावेळी अपशकून झाला मात्र शिवसेनेचे १०-२०च्या वर कुठे कार्यकर्ते दिसले नाहीत, असे नारायण राणे म्हणाले. संजय राऊत यांनी स्वत:च्या मालकांच्या मुलांकडे लक्ष द्यावे. माझ्या मुलांची काळजी करू नये. माझी मुले हुशार आहेत. माझ्यावर त्यांचे प्रेम आहे. त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावे.

नारायण राणेंवर टीका करणाऱ्यांना शिवसेनेत चांगली वागणूक मिळते. सामनातील अग्रलेखात वैयक्तिक टीका केली तर प्रहारमधून त्यांच्यावर टीका करणार असल्याचे राणे म्हणाले. संजय राऊत यांना आपण किंमत देत नाही, संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची अधोगती होत आहे, असा घणाघात केंद्रीय लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!