कुरनूर : अक्कलकोट तालुक्यातील शुक्रवारी रात्री आणि शनिवारी अशा सलग दोन दिवस संध्याकाळी पावसाने हजेरी लावली यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये काही भागांमध्ये गारपिटांचा पाऊस झालेला दिसून येत आहे. या दरम्यान काहीवेळ वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.
काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने पावसाचा अंदाज दर्शवला होता त्यानुसार शुक्रवारी पावसाने हजर लावली. विशेष करून अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे गरापिठाचा पाऊस झाला. तर काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्याबरोबरच कुरनूर, बोरगाव, बादोले, चपळगाव, बावकरवाडी, वागदरी, चुंगी,आदी भागात पावसाने हजेरी लावली. ज्या भागात गारपीठ झालेली आहे. किंवा पावसाने नुकसान झाले आहे अशा भागात पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. केवळ अक्कलकोट तालुका च नव्हे तर मराठवड्या मध्ये सुध्दा अवकाळी पावसाने थैमान घातले असून पुढचे तीन चार दिवस पुन्हा पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शेतकरी हवालदीत..!
या अवकाळी पावसामुळे आणि झालेल्या गारपीटीमध्ये गहू, हरभरा, या पिकावर याचा परिणाम झाला आहे तसेच द्राक्षे सारख्या फळबागाला सुद्धा याचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेल असून शासनाने यासंदर्भात पंचनामे करून शेतकऱ्यांमध्ये जाहीर करावी असे अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.